सोरायसिस म्हणजे काय ?

 • सोरियासिस म्हणजे अशी अवस्था ज्यामध्ये त्वचेवर विविध आकारात कोरड्या आणि चंदेरी पापुद्र्यांसहित लालसर रंगाचे डाग विकसित होऊ लागतात.
 • सोरियासिसला हिंदीमध्ये छालरोग असे म्हणतात.
 • सोरियासिसमध्ये त्वचा सुजते आणि त्वचेच्या पृष्ठभागावर लाल रंगाचे उंचवटे दिसू लागतात ज्यांना अतिशय खाज सुटते. ह्या भागात त्वचा जाडसर होऊ लागते आणि लालसर डाग चंदेरी पापुद्र्यांचे आवरण तयार होते. काहीवेळा सांध्यांवरची त्वचा फुटू शकते.
 • सोरियासिस हे बहुधा कोपर, गुडघे, डोक्यावरील त्वचा, पाठीचा खालचा भाग, हाताचे आणि पायाचे तळवे ह्या ठिकाणी आढळून येते. ह्या रोगाचा हाताच्या आणि पायाच्या नखांवर पण परिणाम दिसू शकतो.
 • सोरियासिस झालेल्या साधारणपणे १५% लोकांमध्ये सांध्यांना सूज येते ज्यामुळे संधिवाताची लक्षणे निर्माण होतात. ह्या अवस्थेस सोरियाटिक अर्थराइटिस असे म्हणतात.
 • शरीराच्या सोरियासिसमध्ये समाविष्ट असलेल्या पृष्ठभागाची टक्केवारी आणि त्याचा रुग्ण्याच्या जीवनमानावर होणार परिणाम ह्यानुसार सोरियासिसचे सौम्य, मध्यम, आणि तीव्र असे वर्गीकरण होते.
 • काही केसेसमध्ये सोरियासिस इतके सौम्य असते कि सुरुवातीला त्याकडे रुग्णाकडून दुर्लक्ष केले जाते.
 • जेव्हा ते वाढते तेव्हा सोरियासिसच्या डागांनी संपूर्ण शरीर व्याप्त होते ज्यामुळे वेदना आणि अति प्रमाणात खाज सुटते; काहीवेळेस सकाळी सांधे दुखतात.
 • एकूण लोकसंख्येच्या सर्वसाधारणपणे २% लोकांमध्ये सोरियासिसचा परिणाम दिसून येतो. केवळ एकट्या यूएसमध्ये ५.५ ते ६ दशलक्ष लोक सोरियासिसने त्रस्त आहेत.
 • पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही सोरियासिसचे प्रमाण सम आहे. ह्याची सुरुवात कोणत्याही वयात होऊ शकते, पण बहुधा १५ ते ३५ वयाच्या प्रौढांमध्ये ते जास्त आढळते.

सोरियासिसचे विकृती विज्ञान:

 • सोरियासिस हा त्वचेला पापुद्रे सुटणे आणि सूज येणे असे वैशिष्ट्य असलेला एक जीर्ण (दीर्घकाळ टिकणारा) रोग आहे.
 • आपली त्वचा मुख्यत्वे दोन थरांची बनलेली असते: एपिडर्मिस (बाहेरील थर) आणि डर्मिस (आतील थर). एपिडर्मिसच्या पेशी ह्या डर्मिस मध्ये तयार होतात आणि मग वर येऊ लागतात. २८ ते ३० दिवसांच्या नियमित कालांतरात एपिडर्मिस मधील पेशींची जागा ही डर्मिस मध्ये तयार झालेल्या नवीन पेशींकडून घेतली जाते.
 • सोरियासिसमध्ये, डर्मिस थरात नवीन पेशी तयार होण्याची प्रक्रिया जलद होऊ लागते. नवीन पेशी तयार होणे आणि त्या त्वचेच्या पृष्ठभागावर येऊ लागणे ही प्रक्रिया पेशींना त्वचेमध्ये समाविष्ट करून घेण्याच्या प्रक्रियेपेक्षा जलद गतीने होऊ लागते. त्यामुळे जास्तीच्या पेशी संचित होऊन त्यांचे खवले पापुद्र्याच्या स्वरूपात सुटू लागतात.
 • सोरियासिसची इतरही वैशिष्ट्ये आहेत ज्यांत सुजलेल्या पेशी आणि विस्तारलेल्या लहान रक्तवाहिन्या ह्यांचा समावेश होतो, ज्यांचे सोरियासिसचे चट्ट्यांच्या दिखावटीत आणि लक्षणात योगदान असते.

तुम्हाला भेट द्यायला आवडतील अशा काही महत्वाच्या लिन्क्स :